ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

चुकीच्या न्यायाची मागणी

घृणास्पद गुन्हा घडल्याशिवाय स्त्रियांच्या म्हणण्यावर समाज विश्वास का ठेवत नाही?

 

काही घृणास्पद घटना घडत नाही, तोवर आपण सगळे निष्क्रिय असतो. मग अशी काही घटना घडली की अचानक आपण न्यायाची दाद मागणाऱ्या योद्ध्याच्या भूमिकेत जातो. अशा घृणास्पद कृत्यांना आपला विरोध आहे, हे शक्य तितक्या उच्चारवात सांगण्याच्या निकडीपायी आणि स्वतःच्या नैतिकता सिद्ध करण्याच्या नादात आपण काही आवाज दडपून टाकतो. हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय शल्यविशारद तरुणीवर क्रूर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. २०१२ साली दिल्लीतील बलात्कारप्रकरणावेळीही हे घडलं होतं. ताज्या बातमीनुसार हैदराबादमधील आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. याचा पुढील तपशील अजून स्पष्ट व्हायचा आहे.

दरम्यानच्या काळात ‘फौजदारी कायदा (दुरुस्ती) अधिनियम, २०१३’, किंवा ‘निर्भया कायदा’ मंजूर करण्यात आला, आणि पोलीस हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आले. लैंगिक छळासंदर्भात दाद मागण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्यांची शिफारस न्यायमूर्ती वर्मा समितीने केली. परंतु, २०१२ सालापासून आत्तापर्यंत अनेक बलात्कार होतच आले आहेत. यातही जणू काही मैलाचे दगड मोजावेत, अशा पद्धतीने आपण दिल्ली, उन्नाव, कठुआ आणि आता हैदराबाद अशा ठिकाणांच्या नावांसोबत स्वतःला स्वतःच्या सभ्यतेची जाणीव करून देतो. पण आपली संतापाची भावना केवळ हत्या करणाऱ्या आणि तीसुद्धा घृणास्पद पद्धतीने हत्या करणाऱ्या बलात्कारींपुरतीच मर्यादित असते. त्यामुळे एखादी बलात्काराची कृती वस्तुनिष्ठपणे धिक्कारणीय ठरण्यासाठी बलात्कार करणाऱ्यांनी विशिष्ट सीमारेषा पार करावी लागते, मगच आपला सामूहिक विवेक जागा होतो. ही सीमा पार होत नाही तोवर आपण वेगवेगळी कारणं देत राहातो. पण एकदा का ही सीमा पार झाली की बचाव करण्याजोगं काही उरत नाही आणि आपण अन्यायाची हाळी देतो.

Dear reader,

To continue reading, become a subscriber.

Explore our attractive subscription offers.

Click here

Comments

(-) Hide

EPW looks forward to your comments. Please note that comments are moderated as per our comments policy. They may take some time to appear. A comment, if suitable, may be selected for publication in the Letters pages of EPW.

Back to Top